१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर
देश बातमी

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे बदल येत्या 1 डिसेंबरपासून होत आहेत. घरगुती वापराच्या एलपीजी सुविधेपासून विमा सेवा आणि रेल्वे गाड्यांच्या बदलत्या वेळा इथपर्यंत हे नवे बदल होणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांविषयी आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात नक्की काय बदल होणार आहेत?
१: एलपीजी किंमतीत बदल
घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत महत्त्वाचे बदल होणार आहेत. केंद्र सरकार दर महिन्याच्या १ तारखेला सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते. गेल्या महिन्यापासून या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामुळे एलपीजी गॅसच्या बाबतीत मोठे बदल होणार आहेत.

२: विमाधारक प्रीमियम बदलू शकतील
अनेकदा लोक विमा पॉलिसीचा हप्ता न भरल्यामुळे पॉलिसी संपते. यामुळे त्यांचे विम्याद्वारे साठवलेले पैसेही बुडतात. परंतु आता नव्या बदलानुसार पाच वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्के कमी करून म्हणजेच अर्धा हप्ता देऊन ते पॉलिसी चालू ठेवू शकतील.

३: नवीन रेल्वे गाड्या धावतील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात रेल्वेविभाग अनेक नवीन विशेष गाड्या सातत्याने चालवत आहे. येत्या 1 डिसेंबरपासून धावणाऱ्या गाड्यांमध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेलचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मू ते पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल ट्रेन दररोज धावतील.

४: RTGS सुविधेचा फायदा 24x7x365
सध्या RTGS सुविधा बँकांच्या कामकाजाच्या दिवशी (दुसरा व चौथा शनिवार वगळता) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु असते. तर NEFT सुविधा डिसेंबर 2019 पासून 24 तास सुरु आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. त्यामुळे आता नागरिक RTGS द्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करु शकतात.