‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर

नवी दिल्ली : अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, टाईप ओ आणि आरएच-निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक कमी आहे. या शोधात 2 लाख 25 हजार 556 कॅनडाई लोकांना सामिल करण्यात आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी ए, एबी, बी रक्तगटाकडून कोरोना व्हायरस पोझिटिव्ह होण्याचा धोका सुमारे 12 टक्के आणि गंभीर कोरोना आणि मृत्यूचा धोका सुमारे 13 टक्के असल्याचं आढळून आलं. या सर्वांचा ब्लड ग्रुप ओ होता. तसंच ज्या लोकांचा ब्लड ग्रुप आरएच-निगेटिव्ह आहे, त्यांचाही कोविड-19 पासून बचाव होईल, असा दावा करण्यात आला आहे. सर्वात कमी धोका ओ रक्तगट असलेल्या लोकांना असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

टोरंटोमधील सेंट मायकल रुग्णालयाचे डॉक्टर आणि संशोधक जोल रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी असू शकते. आता त्यांचा पुढील शोध याच अँटीबॉडीबाबत असणार आहे. या संशोधनासह असाही दावा केली आहे की, गंभीर कोविड-19 प्रकरणात व्हिटॅमिन डी पूर्णपणे अयशस्वी असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, देशासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. भारतासह इतर देशातील स्थितीही आता पुन्हा चिंताजनक होऊ लागली आहे. कोरोना वॅक्सिनकडे सर्वाच्या नजरा असून अनेक देशात यावर काम सुरू आहे. याचदरम्यान, या संशोधनामध्ये ब्लड ग्रुपची माहिती मिळाली आहे, ज्याला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका सर्वात कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.