एम्सचे प्रमुख म्हणतात…; तिसरी लाट टाळता येणं अशक्य
कोरोना इम्पॅक्ट बातमी

एम्सचे प्रमुख म्हणतात…; तिसरी लाट टाळता येणं अशक्य

नवी दिल्ली : भारतात पुढील सहा ते आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. तिसरी लाट येणं अशक्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंधांनंतर शिथिलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं त्यासाठी वाईट पर्याय नसल्याचंही सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी कोरोनाविराधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी आपण गर्दी रोखण्यासाठी तसंच कोरोनासंबंधी सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी काय भूमिका घेतो यावर सगळं अवलंबून असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. देशातील पाच टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले असून लसीकरण पूर्ण झालं आहे. वर्षअखेरपर्यंत १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. अनलॉक करत असताना लोकांचं वर्तन महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगताना विषाणू सतत बदलत असल्याने आपण काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच लाटांमधील अंतर कमी होणं चितेंची बाब असल्याचं गुलेरिया म्हणाले आहेत.