यंदाचा वशाटोत्सोव होणार ग्रँडवशाटोत्सव; दिग्गजांची राहणार उपस्थिती
पुणे बातमी

यंदाचा वशाटोत्सोव होणार ग्रँडवशाटोत्सव; दिग्गजांची राहणार उपस्थिती

पुणे : सालाबादाप्रमाणे यावर्षीही हे थोर आहे फेसबुकीय मित्रमंडळाकडून वशाटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वशाटोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यावर्षी अनेके दिग्गज व्यक्ती यंदाच्या वशाटोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार असणार आहेत. त्याचबरोर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय व्यक्तीसोबत साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असून ऑनलाइन सीट्स बुकिंग करण्याचा पर्यायही उपलब्ध करण्यात आलेला आहे. कार्यक्रमानंतर व्हेज, नॉन व्हेज आणि फराळ अशा तिन्ही प्रकारच्या जेवणाची सोय करण्यात आली असून बुकिंगसाठी ९९ रुपये आकारण्यात आले आहेत. कार्यक्रम पुण्यातील चांदणी चौकात असणाऱ्या चांदणी लॉन्स येथे २० फेब्रुवारी २०२० रोजी होणार होणार आहे.

कार्यक्रमाला कोण कोण लावणार उपस्थिती?
१) खा. शरद पवार, प्रमुख राष्ट्रवादी काँग्रे पक्ष
२) खा. संजय राऊत, शिवसेना नेते
३) ना. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, काँग्रेस नेते
४) ना. धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
५) ना. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
६) दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री
७) विजय चोरमारे, ज्येष्ठ पत्रकार
८) राजू परुळेकर, ज्येष्ठ पत्रकार
९) किरन माने, मराठी अभिनेते