डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा
राजकारण

डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. दिशा रवीच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेवरून कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत” अशी घणाघाती टीका प्रियंका यांनी केली आहे. “डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से” अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

तर दुसरीकडे दिशाच्या अटकेनंतर आता आणि शशी थरूर यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल” असं म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शशी थरूर यांनी जम्मू-काश्मीरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील दिशाच्या अटकेवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे. या तीन बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेतील ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर “ते (मोदी सरकार) घाबरले आहेत. असे म्हणत राहुल गांधीनी केंद्रावर निशाणा साधला आहे.