राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…
देश बातमी

राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा; केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे…

करनाल : मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा थेट इशाराच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. तसेच, केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर, जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत, असा निर्धार टिकैत यांनी व्यक्त केला. पंच आणि मंच एकच असेल, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. गाझीपूर सीमेवर नाही तर सिंघू सीमेवरच कार्यालय असेल, असे त्यांनी नमूद केले. सरकारी अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये. त्यांनी गाझीपूर सीमेवर सांगितले असले, तरी सिंघू सीमेवरच कार्यालय असेल. मंच आणि पंच वेगळे राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ”दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत. केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला.