दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी २५ रुग्णांचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना
देश बातमी

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी २५ रुग्णांचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली : दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून आठवड्यात दुसऱ्यांदा ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंगाराम हॉस्पिटलमधील घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आणखी २५ रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची महिती समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने नाशिकमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डी. के. बालुजा यांनी सांगितलं.

सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाचं ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.