ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षातील वयोगटासाठी लसीकरणाला परवानगी
बातमी विदेश

ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षातील वयोगटासाठी लसीकरणाला परवानगी

लंडन : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असून याचा परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझर/बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनच्या औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित असून त्याचे धोक्यापेक्षा फायदेच अधिक आहेत, असे नियामकांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युरोपीय समुदायाच्या औषध नियामकांनी या लसीला त्यापूर्वी मान्यता दिली होती. या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे का याचा आढावा घेण्यात आल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली, असे औषधे आणि आरोग्यविषयक उत्पादने नियामक यंत्रणेने म्हटले आहे.

अमेरिकेतही फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आली असून तेथे १२-१५ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. अनेक देशांनी १२-१५ वयोगटासाठी लसीला मान्यता दिली आहे.