पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट
मनोरंजन

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर दिया मिर्झाचं ट्विट

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत मांडताना नेहमीच दिसत असते. नुकताच दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दिया चर्चेत आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एवढंच नाही कर तिने संशोधनावर आधारित एक अहवालही त्यासोबत शेअर केला आहे. पर्यावरणातील विषारी रसायनांमुळे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिरकल्सवर याचा परिणाम होतो. थोडक्यात दुषित पर्यावरणाचा परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे. असे त्या अहवालात म्हटले आहे. आता तरी जग हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेईल. असे कॅप्शन दियाने तो अहवाल शेअर करत दिलं आहे.

दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. दिया पर्यावरणाच्या बाततीत जागरूग आहे. ती नेहमची त्या बद्दल ट्विट करत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करते.