वर्षाला ६ सिलेंडर, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत; अण्णाद्रमक’चे आश्वासन
राजकारण

वर्षाला ६ सिलेंडर, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत; अण्णाद्रमक’चे आश्वासन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने रविवारी जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातून मतदारांवर आश्वासनांचा पाऊसच अण्णाद्रमुक पाडला आहे. अण्णाद्रमुकने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, सध्या ज्येष्ठ नागरिकांना १ हजार रुपये पेन्शन मिळते, ती २ हजार करण्याचं अण्णाद्रमुकने दिलं आहे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी घेतलेलं शैक्षणिक कर्ज माफ करण्याचं आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत देण्याचं वचनही अण्णाद्रमकने दिलं आहे. मध्यान्ह भोजन आहार नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुरू करण्याचाही समावेश जाहीरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे.

जाहीरनाम्यात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मातृत्व रजा वाढवून एक करण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यातून केली आहे. याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाचं तामिळनाडू उच्च न्यायालय असं नामांतर करण्याची आणि श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना देण्याचाही जाहीरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करेल, असंही अण्णाद्रमुकने म्हटलं आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाला 2 मे रोजी लागेल. राज्यात भाजपाने सत्तारुढ अण्णा द्रमुक पक्षासोबत युती केली आहे. तर काँग्रेसची प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकशी युती आहे. तामिळनाडूमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका खास आहेत. जे. जयललीता आणि एम. करुणानिधी या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ही विधानसभा निवडणूक होणार आहे.