शेतकऱ्यासंबधी केलेल्या धक्कादायक विधानानंतर जे.पी. दलाल यांचा सरवासारव करण्याचा प्रयत्न
राजकारण

शेतकऱ्यासंबधी केलेल्या धक्कादायक विधानानंतर जे.पी. दलाल यांचा सरवासारव करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : “माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो. माझं विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं,” असं म्हणत हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी रोष थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, जे.पी. दलाल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते ”शेतकरी आंदोलनास्थळी मरण पावलेले शेतकरी घरी असते, तरी मेले असते, असे धक्कादायक विधान केल्याचे दिसत आहे. ‘आप’ने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी भिवानी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर दलाल यांनी खुलासा करत सावरासारव करण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमात दलाल यांना दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या २०० शेतकऱ्यांबद्दल विचारण्यात आली होती. त्यावर आंदोलनाच्या ठिकाणी मरण पावलेले शेतकरी घरी असते, तरी मेले असते. इथे मरत नाहीत का? मी काय म्हणतो लाख दोन लाखांपैकी सहा महिन्या दोनशे लोक मरत नाहीत का? कुणी ह्रदयविकाराने मेले, कुणी ताप आल्याने मेले,’ असं दलाल म्हणाले.

एखाद्या घटनेत दहा लोकांचा मृत्यू झाला, तरी पंतप्रधान दुःख व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं दिसलं नाही. त्यावर दलाल म्हणाले,”हे दुर्घटनेत मरण पावलेले नाहीत, ना स्वतःच्या इच्छेने. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत.” दलाल यांच्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालं. टीकेचे लक्ष्य ठरल्यानंतर दलाल यांनी खुलासा करत सावरासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.