उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, ‘ती’ केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा
राजकारण

उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, ‘ती’ केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी (Narayan rane) केला आहे. जुहू येथील निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापणा केल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी नारायण राणे म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं आहे. आता राज्य विकासाच्या मार्गावर घोडदौड करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लोकांवर अन्याय होणार नाही. सुशांत राजपूत आणि दिशावर अत्याचार करून ठार मारण्यात आले. असले प्रकार यापुढे होणार नाहीत. सुशांत आणि दिशाची केस अजूनही संपली नाही. भविष्यात असं घडू नये म्हणून शिंदे सरकार निश्चितच प्रयत्न करेल. असे म्हणत उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) टोला लगावला.

कनाथ शिंदेंवर कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका करणारे उद्धव ठाकरेच (uddhav thackeray) कंत्राटी मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात इतक्या अपमानित पद्धतीने कुणाला पायउतार व्हावं लागलं नसेल. घरात बसून मुख्यमंत्रिपद सांभाळायचे. अडीच वर्षात मंत्रालयात ३ तास गेले. ही कारकिर्द. राज्यातील जनतेला काय मिळालं? मराठी माणसाला काय दिले? हिंदुत्वासाठी काय केले? उद्धव ठाकरेंना निवृत्ती मिळालीय आता गपचुप घरी बसा. तुम्हाला जे काही मिळाले हे साहेबांच्या नावावर मिळाले. उद्धव ठाकरे हे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत असा घणाघात नारायण राणेंनी केला.