अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…
राजकारण

अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…

पश्चिम बंगाल : ”आजवर मी अनेक रोड शो केले आहेत. पण असा रोड शो मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही.” असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या रोडशोबाबत काढले आहे. गृहमंत्री अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज बंगालच्या रस्त्यांवर मेगा रोड शो करत शक्ती प्रदर्शन करताना दिसतआहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविडचं संकट असतानाही शहा यांच्या या ‘रोड शो’ला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, “आजवर मी अनेक रोड शो केले आहेत. पण असा रोड शो मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही. पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवंय याची साक्ष देणारी ही गर्दी आहे. जनतेनं आता यावेळी भाजपला विजयी करण्याचं मनात पक्क केलं आहे. ममता ब्रनर्जींच्या सरकारविरोधात प्रचंड राग येथील जनतेमध्ये पाहायला मिळतोय.”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सध्या प.बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात अमित शहा यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीपासून ते निवडणुकीसाठीची रणनिती आणि प्रचाराचं काम केलं. प.बंगालच्या बोलपुर चौक ते डाक बंगलापर्यंत अमित शहा यांच्या ‘रोड शो’चं आयोजन करण्यात आलं.

प.बंगालच्या बीरभूममधील बोलपूर येथून अमित शहा यांच्या ‘रोड शो’ला सुरुवात झाली आहे. बोलपूर ते हनुमान मंदिर आणि पुढे डाक बंगला येथे रोड शो संपणार आहे. अमित शहा यांच्या ‘रोड शो’चं अंतर फक्त २ किमी आहे. पण भाजप समर्थकांनी तुफान गर्दी केल्यानं शहा यांचा ताफा अत्यंत धीम्यागतीने मार्गस्थ होत आहे. बोलपूरच्या रस्त्यावर यावेळी भाजपच्या समर्थकांनी तुडुंब गर्दी केली आहे. अमित शहा यांच्यासोबत कैलास विजयवर्गीय, दिलीप घोष आणि इतर भाजप नेते उपस्थित आहेत.

तथापि, अमित शहा यांच्या या दौऱ्यात पश्चिम बंगालच्या ममता सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. शनिवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि सुवेंदू अधिकारी यांच्यासह बंगालच्या जवळपास ४२ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे ममता बॅनर्जींसहीत काँग्रेस आणि सीपीएमलाही मोठा झटका बसलाय.