राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण
राजकारण

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे नोटीस पाठवली आहे. मात्र खडसे आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. याचे कारण म्हणजे एकनाथ खडसे यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. ”३० डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होण्याबाबत अंमलबजावणी  संचालनालय (ईडी) कडून समन्स प्राप्त झाले होते. ईडी कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी हजर होणार होतोच. मात्र मध्यंतरी 28 डिसेंबर रोजी ताप, सर्दी, कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाची चाचणी घेतली. निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक आहे. तसे ईडी कार्यालयास कळवले आहे. त्यांनी 14 दिवसांनंतर हजर होण्याबाबत संमती दिलेली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर सक्त वसुली संचालयास (ईडी) पूर्ण सहकार्य करणार आहे. धन्यवाद”

दरम्यान, 30 डिसेंबरला होणाऱ्या ईडी चौकशीसाठी एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले. मात्र मागील दोन दिवसांपासून खडसे यांचा ताप, सर्दी आणि खोकला जाणवत आहे. कोरोनाची लक्षणे असल्याने चाचणी केली असून अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवलं असून त्यांनी 14 दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी केले आहेत. आता देखील सहकार्य करेन. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले ईडीच्या नोटीसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.