मिशन पश्चिम बंगाल ! भाजपकडून एका महाराष्ट्रीयन नेत्याला तर काँग्रेसकडून कोणालाही नाही स्टार प्रचारक म्हणून संधी
राजकारण

मिशन पश्चिम बंगाल ! भाजपकडून एका महाराष्ट्रीयन नेत्याला तर काँग्रेसकडून कोणालाही नाही स्टार प्रचारक म्हणून संधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये येत्या २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष मैदानात उतरले आहेत. भाजपने गुरुवारी ११ मार्च रोजी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत काँग्रेसने देखील आपल्या ३० स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. या दोन्ही पक्षाच्या यादीत महाराष्ट्रीयन नेत्यांना संधी देण्यात आलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपकडून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी वगळता एकाही महाराष्ट्रीयन नेत्याचा स्टार कम्पेनर्स म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. काँग्रेसकडून अंतरिम पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, नवज्येत सिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग आदींचा समावेश आहे.

तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, नुकतेच भाजपवासी झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती, यश दासगुप्ता, श्रबंती चटर्जी, पायल सरकार, हिरेन चटर्जी, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, जुअल ओराम, स्मृती इराणी अशा एकूण ४० दिग्गजांचा समावेश आहे.