थरकाप उडवणारा VIDEO! २५ जणांनी खच्चून भरलेली बोट गंगेत उलटली
देश बातमी

थरकाप उडवणारा VIDEO! २५ जणांनी खच्चून भरलेली बोट गंगेत उलटली

गाझिपूर: उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथीस रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी प्रवाशांनी गच्च भरलेली बोट अनियंत्रित होऊन नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १९ जणांना गावकऱ्यांनी वाचवले आहे. आपल्या जनावरांना चारा घेऊन जात असताना भीषण दुर्घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच डीएम एमपी सिंह, पोलिस अधीक्षक रोहन पी बोत्रे यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठरावे गावात सध्या पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांना डिझेलवर चालणाऱ्या बोटीची व्यवस्था करुन दिली आहे. ज्यामुळे गावकरी नावेतून गावातून बाहेर ये-जा करु शकते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे २५ जण नावेतून घरी जात होते. अठराव्या गावापूर्वी अचानक बोटीत कल्व्हर्टजवळ पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बोटीतील गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

आरडाओरडा ऐकून गावकऱ्यांची नदीच्या किनाऱ्यावर गर्दी झाली. गावकऱ्यांनी १९ जणांना कसेबसे पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्वांना ट्रॅक्टर-ट्रॉलीवर भरून भदौरा सीएचसी येथे उपचारासाठी आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी अठ्ठा गावचे रहिवासी शिव शंकर उर्फ डब्ल्यू गौर (४०) आणि नगीना पासवान (५०) यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी खलाशी रामसिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत.