विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी
राजकारण

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी

धुळे : विधान परिषदेचा पहिला निकाल आताच हाती आला असून भारतीय जनता पक्षाच्या अमरीश भाई पटेल यांनी बाजी मारली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपचे अमरीश भाई पटेल यांना 332 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली. तर 4 मते बाद झाली आहेत. दरम्यान राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.विलासनगर येथील शासकीय गोदामात असलेल्या मजमोजणी स्थळी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या.