मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसलेंची राज्यसरकारवर टीका
राजकारण

मराठा आरक्षण: खासदार संभाजीराजे भोसलेंची राज्यसरकारवर टीका

सातारा : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारनं केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा खासदार उदयन राजे भोसले यांनी फेसबुक वरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यसरकारवर ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर आपली भूमिकाही स्पष्ट केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर आज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनीदेखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”१०२ वी घटना दुरूस्ती बाबतीत सविस्तर संवाद व सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा. असं ट्वीट करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. असं संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असं देखील बोलून दाखवलं.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ”मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं.

उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. पण, सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे.