काँग्रेसच्या बैठकीतच नेत्यांमध्ये वाद; राहुल गांधींची मध्यस्थी
राजकारण

काँग्रेसच्या बैठकीतच नेत्यांमध्ये वाद; राहुल गांधींची मध्यस्थी

नवी दिल्ली : काँग्रसेच्या बैठकीतच दोन गटामध्ये वाद झाला असल्याचे समोर आले असून याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. राहुल गांधींसमोर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी राहुल गांधी सर्व काही संपवा आणि आता पुढचा विचार करा असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जून २०२१मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती के सी वेगणुगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केलं जावं अशी मागणी केली. निवडणुकांमधील पराभवानंतर या नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावरुन गदारोळ निर्माण झाला होता.

दुसरीकडे गांधींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए के अँटनी, तारिक अन्वर यांनी बंगाल आणि तामिळनाडू यांच्यासहित पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. यावेळी एका नेत्याने म्हटलं की, आपण नेमक्या कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत आहोत? भाजपा आपल्याप्रमाणे अंतर्गत राजकारणावर चर्चा करत नाही? त्यांची प्राथमिकता आधी राज्यांच्या निवडणुका आणि नंतर संस्थात्मक निवडणुका असतात. अखेर दुसऱ्या गटाने माघार घेतली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोनिया गांधी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १९९७ मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरुन माघार घेतल्यानंतर २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा सूत्रं सोपवण्यात आली होती.