उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात
राजकारण

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिएलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत झालेल्या प्रकरणांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाचं प्रकरण काहीतरी देऊन सेटल केलं. त्यांनी यासाठी काय दिलं हे त्यांनाच ठाऊक, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ”सरकार आणि पोलीस संजय राठोड यांना वाचवण्याचं काम करत आहेत. फोटो, ऑडिओ क्लीप आणि व्हीडिओ या गोष्टी आभाळातून बाहेर पडल्या आहेत का?, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. तसेच पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर आम्ही चौकाचौकात आंदोलनं करु, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.

निलेश राणे पुढे म्हणाले की, ” अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणाप्रमाणे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणही दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास 70 दिवसांनी पोलिसांकडे गेला. तोपर्यंत पुरावे नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला नाही. असा दावाही निलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून त्यांनी एक ट्वीट देखील केले आहे, ”ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे.पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.