शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका
राजकारण

शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका

नागपूर : ”राज्यात राजकीय पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यावर सरकार बंदी आणत नाही मात्र राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करतांना कलम १४४ लावले जाते. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील,”अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून राज्यातील अनेक सण, उत्सव हे साधेपणाने साजरे केले जात आहेत. आज साजऱ्या होत असलेला शिवजयंती सोहळाही अनेक निर्बंधांसह साजरा होत आहे. शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच, शिवजयंती व विज बिल संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची तुलना मोगलाई’शी केली आहे.

आज ते नागपूर येथे शिवजयंती उत्सवात सहभागी झाले तेव्हा बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ”राज्य सरकार विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे.. विदर्भ वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.वैधनानिक विकास मंडळ बंद करून यांनी विदर्भ व मराठवाडा मधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, ” राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे त्यावर अजून निर्णय यायचा आहे… आता यावर बोलणे योग्य होणार न्यायालयाचा निर्णय आल्यावर भूमिका मांडू, असे त्यांनी सांगितले. वीज बिलावर काँग्रेस सत्तेत राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न करत आहे.मंत्री काँग्रेसचा आहे मग ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. जनता मूर्ख नाही त्यांना सर्व समजते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

तसेच, महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही, केंद्र सरकारने कृषिचा सेज पेट्रोल डिझेल वर लावून ३ रुपये टॅक्स कमी केला, तसे राज्य सरकार करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अधिक पेट्रोल डिझेल साठी अधिक पैसे मोजावे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.