Devi Singh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन
राजकारण

Devi Singh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

Devi Singh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभताई पाटील यांचे पती माजी खासदार देवीसिंह शेखावत यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह शेखावत हे अमरावती जिल्यातील पहिले महापौर आणि माजी आमदार होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देवीसिंह शेखावत हे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आणि माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे वडील आहेत.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची तब्येत साथ देत नव्हती. अखेर आज सकाळी 9.30 च्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्य मध्ये सायंकाळी ठीक ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.