महाराष्ट्राच्या राजकारणात सारं काही आलबेल नाही, शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा
राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात सारं काही आलबेल नाही, शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात याबद्दल अजून निकाल यायचा बाकी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलाय. या निकालानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावं, असं वेळोवेळी त्यांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसतोय.त्यातूनच पुण्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती टीव्ही ९ ने दिली आहे. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून परिस्थिती हाताळली गेली. नंतर वाद निवळण्यात पोलिसांना यश आलं.