पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पूजा चव्हाणची आत्महत्या आत्महत्या दुर्दैवी आहे, परंतु थेट संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहे, पोलीस योग्य तो तपास करतील असं त्यांनी सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राजीनामा घेतला नाही, मग संजय राठोड यांना राजीनामा का द्यायला लावायचा? असा प्रश्न एका गटाकडून विचारला जात आहे, शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील, त्यामुळे चुकीचा पायंडा पासु शकतो. अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, परळीच्या पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात केलेल्या आत्महत्त्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे, संजय राठोड यांच्यावर कारवाई करू नये यासाठी शिंदे सक्रीय असल्याचं बोललं जात आहे. तथापि, संजय राठोड हे यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार आहेत, यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण पाहिले तर याठिकाणी प्रखरतेने शिवसेनेत दोन गट असल्याचं दिसून येते. याप्रकरणी राज्यातील भाजपा नेते संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिवसेनेतही दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे भावना गवळी गटाला आयती संधी चालून आली आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाचे मानले जातात. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यामागे बहुतांश आमदार आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध आणि सरकार अडचणीत येत असेल तर संजय राठोड यांचा राजीनामा द्यायला हवा यासाठी विदर्भातील काही नेते सक्रीय आहेत. .

एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहेत. दरम्यान, शिवसेनेत कोणतेही गटतट नाहीत, उद्धव ठाकरे संजय राठोड प्रकरणात निर्णय घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.