काँग्रेस आमदाराचे मंत्री अनिल परबांवर गंभीर आरोप
राजकारण

काँग्रेस आमदाराचे मंत्री अनिल परबांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगले असून यानिमीत्त महाविकासआघाडीतील धूसफूस समोर आली आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचं आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी संताप व्यक्त करत शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिद्दीकी म्हणाले, मी ज्या विधानसभा क्षेत्रातून आमदार आहे त्या वांद्रे पूर्व विभागात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार आहे मात्र, मला आमंत्रण देण्यात आले नव्हते. शिवसेनेचे मंत्री अनिल परब होते, माजी महापौर आणि ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्या विश्वनाथ महाडेश्वर यांना बोलावण्यात आलं होतं. इतर नगरसेवक, वॉर्ड अधिकारी होते. मात्र, आमदाराला बोलावणं त्यांना गरजेचं वाटलं नाही.

सिद्धीकी यांनी काय केले आहेत आरोप?
सिद्धीकी म्हणतात, अनिल परब हे कायम करत आले आहेत. यापूर्वी सुद्धा मी जे काही काम करत असेल त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बीएमसी कधी एनओसी देत नाही, कधी उशीरा देतात. जे काही काम मी करण्याचा प्रयत्न करतो त्यात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे. मी काम करत आलो आहे आणि करत राहणार. अनिल परब हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी समजून घ्यायला हवं की नागरिकांनी मला निवडून दिलं आहे आणि मला काम करुन द्यायला हवं अशी प्रतिक्रिया आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे.