कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा
राजकारण

कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा

पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले. खरंतर जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पडळकरांनी त्यापूर्वीच पुतळ्याचे बेकायदेशीररित्या अनावरण करत त्याठिकाणी घोषणाबाजी केली. यावेळी मंदिर संस्थानाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची झटापटही झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात टीका आणि संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत स्पष्टीकरण देताना, पडळकर यांनी शरद पवारांवरही टीका केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने करावे हा अहिल्याबाईंचा अपमान आहे, असं म्हणत पडळकर आणि कार्यकर्ते यांनी पुतळ्याचं अनावरण करत जेजुरी गडावर गोंधळ घातला. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तात्काळ मिटला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून गोपीचंद पडळकर यांना टोला लगावलाय.

आव्हाड यांनी शायरीतून पडळकरांना कुत्ते भोकते है. असं म्हटलंय. ”तजुर्बे ने शेरों को खामोश रहना सिखाया; क्योंकि दहाड़ कर शिकार नहीं किया जाता; कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; मगऱ जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बंयाँ करता है।, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना कुत्र्याची उमपा दिली आहे.

संभाजी ब्रिगेडने गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला. कोणत्याही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजविण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. जेजुरी येथे सुद्धा अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे, त्याचे अनावरण राज्य सरकारच्या वतीने अधिकृत केले जाईल. मात्र, सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासा पोटी विरोधाचे विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार हे स्टंट करण्यासाठी पुतळ्याचे अनावरण करतात, हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा सुद्धा अवमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा अनावरण करणार असेल यांच्या पोटात राजकारणाचे पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडने पडळकरांवर टीकास्त्र सोडले आहे.