बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?
राजकारण

बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?

काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांनी मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं काल शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं होतं. आज त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने अक्षरशः झोंबणारी टीका केली आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके…. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा सल्ला पदाधिकाऱ्याने दिलाय. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना हे प्रत्युत्तर दिलंय.

साडीवरून टीका का?
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर हा त्यांचा डायलॉग फेमस झाला. अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या. आमदार असून निधी कमी पडतोय, खूप गरीबीत राहतोय, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यातच किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पंढरपूरच्या युवासेना नेत्यानं त्यांना आधी ती साडी घेऊन या असा सल्ला दिलाय. त्यातच काल गणरायासमोर काय साकडं घातलं, यावर विचारलं असता मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी म्हटलं. यावर त्यांना शिवसेनेतून प्रत्युत्तर मिळालंय.

इंगोले यांची पोस्ट काय?
युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समंद कसं ओके…. बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला 50 खोक्यातून साडी घेऊन द्या, अशी बोचरी टीका करणाऱ्या पोष्ट सोशल मीडियात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत.