Asia cup २०२२ : भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स
क्रीडा

Asia cup २०२२ : भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांनी सलग दोन सामने जिंकले आहे. अफगाणिस्तानने (Afganistan) श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला नमवलं. काल झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. आता पाकिस्तान आणि हाँगकाँगचा सामना बाकी आहे. पाकिस्तानने हाँगकाँगवर विजय मिळवला, तर चार सप्टेंबरला रविवारी पुन्हा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुपर 4 मध्ये राऊंड रॉबिन सामने
आशिया कप स्पर्धेत दोन ग्रुप आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या टीम्स आहेत. प्रत्येक गुपमधील टॉप 2 टीम सुपर 4 साठी पात्र ठरतील. A1, A2 आणि B1, B2 या चार टीम्स सुपर 4 मध्ये असतील. सुपर 4 स्टेज मध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होतील. प्रत्येक संघ परस्पराविरुद्ध खेळेल.

आशिया कप मध्ये सुपर 4 चे सामने कधी आणि कुठे होतील?
आशिया कप मध्ये सुपर 4 स्टेज 3 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शारजा क्रिकेट स्टेडियम आणि दुबई क्रिकेट स्टेडियम मध्ये हे सामने होणार आहेत.

भारत-पाकिस्तान मध्ये 3 सामने होणार?
ए ग्रुप मध्ये पाकिस्तान दुसऱ्या स्थानी राहिल्यास रविवारी 4 सप्टेंबरला भारताविरुद्ध सामना होईल. सुपर 4 राऊंड-रॉबिन मध्ये दोन्ही टीम्स टॉप 2 मध्ये राहिल्यास 11 सप्टेंबरला पुन्हा भारत-पाकिस्तान मध्ये फायनल होऊ शकते.