हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला
राजकारण

हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाडमध्ये जन आशिर्वाद यात्रेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेनं युवासेनेच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या जुहूच्या घराबाहेर जमण्यास सांगितल्याचं ट्विट करत सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करु नका असा टोला शिवसेनेला लगावला. मात्र आता यावरुनच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ही तुलना म्हणजे सिंहाचा अपमान आहे अशी टीका केली आहे.

याच टीकेसंदर्भात खासदार विनायक राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राणेंच्या घराची तुलना सिंहाच्या गुहेशी करणे हा सिंहाचा अपमान असल्याचा टोला लगावला. “राणेंचं घर ही सिंहाची गुहा नाही कोल्ह्याची आहे. लाचार लोकांच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान, अशा शब्दांमध्ये राऊतांनी टीका केली. इतकच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राणेंचा राजीनामा घेण्यात यावा यासंदर्भातील मागणी करणारं पत्र लिहिलं असल्याचंही सांगितलं आहे.