पिनरायी विजयन सलग दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदी
राजकारण

पिनरायी विजयन सलग दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदी

नवी दिल्ली : केरळमध्ये ६ एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) नेतृत्व करून तिला ऐतिहासिक असा सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून देणारे माकपचे ज्येष्ठ नेते पिनरायी विजयन यांनी गुरुवारी २० मंत्र्यांसह सलग दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सेंट्रल स्टेडियममध्ये झालेल्या साध्या कार्यक्रमात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ७७ वर्षांचे विजयन व त्यांचे मंत्री यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी राज्यघटनेच्या नावाने, तर पाच जणांनी ईश्वाराच्या नावाने शपथ घेतली. माकपच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळातील इंडियन नॅशनल लीगचे प्रतिनिधी असलेले अहमद देवरकोविल यांनी अल्लाच्या नावाने शपथ घेतली.

महासाथीची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पॉलिटब्यूरोचे ज्येष्ठ सदस्य, भाकपचे राज्य सचिव कानम राजेंद्रन, तसेच विविध धार्मिक संघटनांचे नेते या कार्यक्रमाला हजर होते.