संजय राऊतांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; मुलगी पुर्वशीचा साखरपुडा समारंभ थाटात साजरा
राजकारण

संजय राऊतांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; मुलगी पुर्वशीचा साखरपुडा समारंभ थाटात साजरा

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. साखरपुडा होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते.

कोण आहेत राजेश नार्वेकर
राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी 2018मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली.