Shiv Sena: मोठी बातमी, संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाने घेतलं ताब्यात, संजय राऊतांना एंट्री नाही!
राजकारण

Shiv Sena: मोठी बातमी, संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाने घेतलं ताब्यात, संजय राऊतांना एंट्री नाही!

Shiv Sena:  शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे विधानसभेतील कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे. आता शिवसेनेचे संसदेतील पक्ष कार्यालयही शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संसद भवनात शिवसेनेचे कार्यालय आहे. ते शिंदे गटाकडे सोपवावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. त्यांची विनंती लगेच मान्य करण्यात आली. संसदेची जागा आता शिंदे गटाकडे सोपवण्यात आली आहे.

त्यामुळे संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे. या तिन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्य शिवसेनेचा विचार केल्यास त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असे संसदीय पक्षनेते राहुल शेवाळे यांनी सांगितले. विनायक राऊत आणि लोकसभेच्या पाच खासदारांसाठीही हाच निर्णय घेतला जाणार आहे.