राज्यपाल नेमलाय की राज्याची बदनामी करायला माणूस? कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंधारे संतापल्या
राजकारण

राज्यपाल नेमलाय की राज्याची बदनामी करायला माणूस? कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंधारे संतापल्या

राज्यपाल कोश्यारी मराठवाडा विद्यापीठात दिक्षांत समारंभावेळी बोलत होते. शिवाजी महाराज तो पुराने जमाने के..आज गडकरी आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं. या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारे संतापल्या. राज्यपाल नेमला का? महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस, असा प्रश्न अंधारेंनी केंद्र सरकारला विचारला. आम्हाला राज्यपाल हवे, भाजपचे पुर्णवेळ कार्यकर्ते नको; असं म्हणत अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी,’आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,’ असे मत व्यक्त केले. यावरून आता वादंग उठले असून अनेकांनी राज्यपालांवर टीका केली आहे. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत टीका केली.