तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
राजकारण

तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या शायरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरलं. विविध विषयांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर तुफान फटकेबाजी केली आणि त्यांना साथ दिली सुधीर मुनगंटीवार यांनी.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वैधानिक विकास महामंडळावरुन ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी अडचणीत आणणाऱ्या मुनगंटीवार यांनी आज केलेल्या शायरीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरु झाल्या आहेत.

आज विधानसभेत विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकमेाकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंह यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.

यानंतर मुनगंटीवार यांनीदेखील शायरीच्या माध्यमातून देशमुखांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा सुरु झाली आहे. तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, असं मुनगंटीवार का म्हणाले? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत का?, भाजपाने ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात सुरु केलंय का? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा चर्चां सुरु झाल्या आहेत.