उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; ६ जण जखमी
राजकारण

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; ६ जण जखमी

सातारा : साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद सर्वश्रुत आहे. मात्र बुधवारी शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिस समोर गाडी लावली आणि त्यातून हा वाद सुरू झाला.

यावेळी कार्यकर्त्यांनी शस्त्रांचा वापर केला आहे. या हाणामारीत उदयनराजे समर्थक सनी भोसलेसह ६ जण या जखमी झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.