गुवाहाटीला चाललाय खरं… पण परतल्यावर तुमचं सरकार पडणार, शिवसेना नेत्याचा मोठा दावा
राजकारण

गुवाहाटीला चाललाय खरं… पण परतल्यावर तुमचं सरकार पडणार, शिवसेना नेत्याचा मोठा दावा

सोलापूर : सोलापूर : हिंदुत्वचा मुद्दा समोर करून राज्यात सत्ता परिवर्तन करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि मिंधे गटाची सरकार आणले. पण या सरकारने हिंदुत्व खुंटीला अडकवला आहे. या राज्यासाठी आराध्य दैवत शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले. त्या शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त विधान करतायत, त्या राज्यपालांची पाठराखण हे राज्य सरकार करत आहे. राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने राज्यात संताप आहे. आंदोलनं आणि जाळपोळ सुरू आहे. आता तुम्हाला हिंदुत्व दिसत नाही का? जे हिंदुत्व तुम्ही छातीठोकपणे मिरवत आहात ते हिंदुत्व गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. गुहावटीला जाताय तर याद राखा… गुहावटीवरून माघारी आल्यावर तुमचं शिंदे गट आणि भाजपचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा युवा सेनेचे राज्य विस्तारक (उद्धव ठाकरे गट) शरद कोळी यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करून सूरतमार्गे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते. गुहावटीत एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. नाट्यमय घडामोडीनंतर गोवा मार्गे हे सर्व आमदार मुंबईत आणि त्यानंतर विधिमंडळात दाखल झाले होते. सत्ताबदल करत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे इतर मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. एकनाथ शिंदें यांचे कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरे गट लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे.