रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?
क्रीडा

रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?

भारतीय आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होतात हा इतिहास आहे. 2019 च्या वर्ल्डकपनंतर महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकपनंतर भारताची जवळपास संपूर्ण टीमच बदलली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतरही भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली सारखे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेणार का हा प्रश्न उपस्थित होतो.

रोहित शर्माची कारकीर्द देखील येणार संपुष्टात?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील 36 वर्षाचा आहे. तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. मात्र वर्ल्डकपनंतर त्याच्याही कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आधीच त्याला टी 20 मालिकेत सातत्याने विश्रांती देण्यात येत आहे. वाढत्या वयाबरोबर त्याला आपला फिटनेस कायम ठेवणे अवघड जाणार आहे त्यामुळे तो देखील वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

फिट विराट कोहली देखील घेणार निवृत्ती?
विराट कोहली जरी भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू असला तरी या वर्ल्डकपनंतर तो देखील सर्व फॉरमॅटमधून नसला तरी एका फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे. तो टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन वनडे आणि कसोटीमध्ये जास्त लक्ष केंद्रित करेल असा अंदाज आहे.