२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर
राजकारण

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ – प्रकाश आंबेडकर

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.आंबेडकर यांनी पत्रकाराशी बोलताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. देश परत एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, असं ते म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरकार कोणाचं येईल हे मी सांगू शकत नाही. पण, २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं वाटतंय. अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यात आत्मविश्वास दिसत नव्हता. पूर्वीच्या भाषणाप्रमाणे त्यांचं हे भाषण नव्हतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.