भारतीय संघाच्या या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
क्रीडा

भारतीय संघाच्या या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : भारतीय संघातील आणि बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकातामध्ये प्रसारमाध्यामांशी बोलताना त्याने ही माहिती दिली. त्यासोबतच त्याने सर्वांचे आभारही मानले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशोक दिंडाने भारतीय संघाचे प्रतिनीधित्तव करताना एकूण १३ एकदिवसीय सामन्यात १२ बळी घेतले आहेत. तर ९ टी-२० सामन्यात १९ बळी घेतले आहेत. तर आयपीएलच्या ७८ सामन्यांत ६९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशोक दिंडाच्या नावावर ४२० विकेट आहेत. दिंडा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अखेरचा खेळला आहे. या स्पर्धेत तो तीन सामने खेळला आहे. निवृत्तीची घोषणा करताना दिंडा म्हणाला की, भारतीय संघाकडू खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं. बंगालकडून खेळल्यामुळेच मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचं आभार मानतो.

३६ वर्षीय दिंडानं १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१९-२० च्या रणजी करंडक क्रिकेट हंदामात फक्त एक सामना खेळल्यामुळे बंगाल क्रिकेट संघटनेकडून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे चालू हंगामाच्या पूर्वार्धात त्यानं गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला.