जयदेव उनाडकटने केले गुपचूप लग्न
क्रीडा

जयदेव उनाडकटने केले गुपचूप लग्न

नवी दिल्ली : भारतीय क्रिकटपटू आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि रिनी गुपचूप विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री गुजारतमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये उनाडकट याचं दोनाचं चार हात झाले. उनाडकट आणि रिनी या दाम्पत्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली नाही. मात्र, या गुपचूप उरकण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. उनादकट आणि रिनी यांच्या विवाहाला फक्त मोजकेच लोक उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उनादकटची पत्नी रिनी वकील आहे. दोघांनी १५ मार्च २०२० रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी उनाडकटच्या नेतृत्वात सौराष्ट्र संघानं रणजी चषकावर नाव कोरलं होतं. जयदेवनं सोशल मीडियावर रिनीसोबत केलेल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. मात्र, लग्नाची सर्व माहिती गुपीत ठेवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उनाडकट आणि रिनी एकमेंकाच्या प्रेमात होते. २०२१ च्या सुरुवातीलाच दोघांनी लगीनगाठ बांधली. उनाडकटला भारतीय संघाकडून जास्तवेळ खेळायला मिळालं नाही. मात्र, तो आयपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. शिवाय त्यानं २०१० मध्ये अंडर -१९ संघाचं नेतृत्वही केलं आहे.