गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज
देश बातमी

गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय कलांकारांच्या विरोधात हिंदी कलाकारांनी थेट भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. अजय देवगन, अक्षय कुमार, कंगना रनौत, सुनील शेट्टी, करण जौहर आणि एकता कपूर सारख्या हिंदी कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या विरोधात परिणामी शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरवात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या हिंदी कलाकारांनी ग्लोबल कलाकारांवर आरोप करत त्यांची देश तोडण्याची चाल असल्याचे म्हटले आहे. हिंदी कलाकारांनी मोदी सरकारच्या समर्थकांनी चालवलेल्या #IndiaTogether आणि #IndianAgainstPropganda सारख्या वापरल्या गेलेल्या हॅशटॅगचे समर्थन केले आहे.

हा हॅशटॅग वापरत अजय देवगनने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, भारत किंवा भारतीयांच्या विरोधात तयार करण्यात येत असलेल्या खोट्या प्रोपेगंडामध्ये फसू नका. तसेच अक्षय कुमारने व‍िदेश मंत्रालयाच्या ट्वीटला रिट्वीट करत क‍िसान आपल्या देशाचा एक महत्वाचा भाग आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला भटकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याकडे लक्ष देऊ नका.

सरकारला वाचविण्यासाठी हिंदी कलाकार पुढे येत आहेत. मात्र, ७० दिवसांपासून शेतकरी थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांच्यासाठी आतापर्यंत हे हिंदी कलाकार समोर का आले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत असून गोदी पत्रकारांप्रमाणे गोदी कलाकारांचीही फौज तयार झाली आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.