टी-२० विश्वकरंडकानंतर भारतात क्रिकेटचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकानंतर भारतात क्रिकेटचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरु होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे सर्व स्टार्स खेळणार आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालेल. त्यानंतर तिथंच टी20 वर्ल्डकप होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाची ती शेवटची टी20 स्पर्धा असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टी20 वर्ल्ड कपनंतरही भारतीय क्रिकेट टीमचं वेळापत्रक गच्च आहे. या स्पर्धेनंतर भारतीय टीम न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्धच्या सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. भारतीय टीमच्या या दौऱ्याचं वेळापत्रक तयार झालं आहे. याची अधिकृत घोषणा 20 सप्टेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्यता आहे.

असा असेल कार्यक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड
पहिली टी20 – 17 नोव्हेंबर – जयपूर
दुसरी टी20 – 19 नोव्हेंबर – रांची
तिसरी टी20 – 21 नोव्हेंबर – कोलकाता
पहिली टेस्ट – 25 ते 29 नोव्हेंबर – कानपूर
दुसरी टेस्ट – 3 ते 7 डिसेंबर – मुंबई

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2022)
पहिली वन-डे – 6 फेब्रुवारी – अहमदाबाद
दुसरी वन-डे – 9 फेब्रुवारी – जयपूर
तिसरी वन-डे 12 फेब्रुवारी – कोलकाता
पहिली टी20 – 15 फेब्रुवारी – कटक
दुसरी टी20 – 18 फेब्रुवारी – विशाखापट्टणम
तिसरी टी20 – 20 फेब्रुवारी – त्रिवेंद्रम

भारत विरुद्ध श्रीलंका (2022)
पहिली टेस्ट – 25 फेब्रुवारी ते 1 मार्च – बंगळुरु
दुसरी टेस्ट – 5 मार्च ते 9 मार्च – मोहाली
पहिली टी20 – 13 मार्च – मोहाली
दुसरी टी 20 – 15 मार्च -धरमशाला
तिसरी टी 20 – 18 मार्च – लखनौ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022)
पहिली टी20 – 9 जून – चेन्नई
दुसरी टी 20 – 12 जून – बंगळुरु
तिसरी टी20 – 14 जून – नागपूर
चौथी टी 20 – 17 जून – राजकोट
पाचवी टी20 – 19 जून दिल्ली