चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका
क्रीडा

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका

दुबई : कोरोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली. आक्रमक सुरुवात केलेल्या क्विंटन डी कॉकला दीपक चहरने पायचित पकडले. त्यानंतर दीपक चहरने अनमोलप्रीतची दांडी गुल करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला. अनमोल आणि डीकॉकने प्रत्येकी १६ आणि १७ धावा केल्या. सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या हे स्टार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. सौरभ तिवारीने ५ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने २५ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने २ बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली.

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकत चेन्नईला २० षटकात ६ बाद १५६ धावा अशी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.