१६ वर्षीय खेळाडूसोबत वडील आणि कोच यांनीच केले गैरवर्तन, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ
क्रीडा

१६ वर्षीय खेळाडूसोबत वडील आणि कोच यांनीच केले गैरवर्तन, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

मुंबई: सध्या न्यूयॉर्कमध्ये 2022 यूएस ओपन हि स्पर्धा सुरु आहे. ही टेनिसच्या यूएस ओपनची १४२ वी आणि वर्षातील चौथी, अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. न्यूयॉर्क शहरातील युएसटीए बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आउटडोअर हार्ड कोर्टवर हि स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेतील सामन्यात महिला टेनिस स्टारच्या वडील आणि प्रशिक्षक यांच्याविषयीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला जगभरातुन नकारात्मक प्रतिक्रिया देखील मिळत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यूएस ओपन २०२२ मध्ये भाग घेणार्‍या १६ वर्षीय महिला टेनिस स्टारचे वडील आणि प्रशिक्षक यांनी तिच्या विजयानंतर आनंद साजरा करताना केलेल्या कृत्यामुळे वादात सापडले आहेत. त्यांच्या देशाच्या दूतावासाला या संबंधी निवेदन जारी करावे लागले, यावरून या वादाचा अंदाज लावता येईल. खरं तर, सामना जिंकल्यानंतर टेनिसपटू सेलिब्रेशन करण्यासाठी वडिलांकडे पोहोचली, तेव्हा त्यांनी तिला मिठी मारली आणि चुंबन घेतल्यानंतर कंबरेच्या खालच्या भागावर हात ठेवला. प्रशिक्षकानेही तेच केले. तेव्हापासून दोघेही सोशल मीडियावर लोकांच्या रडारवर आहेत.

कोच आणि वडिलांच्या कृत्याने टीका

सारा बेझलेक असे या टेनिसपटूचे नाव असून ती झेक रिपब्लिकची आहे. पात्रता सामन्यात ब्रिटनच्या हीदर वॉटसनला पराभूत केल्यानंतर ती तिच्या वडिलांकडे जात त्यांना मिठी मारून अभिवादन करते. पण त्यानंतर जे घडलं ते सोशल मीडियावर वादळ निर्माण करणारं होतं. साराच्या वडिलांनी मुलीच्या ओठांचे चुंबन घेतले आणि तिच्या कमरेच्या खालच्या भागावर हात ठेवला. जेव्हा ती कोचजवळ पोहोचली तेव्हा कोचने ओठांवर चुंबन घेतले नाही पण साराच्या कमरेच्या खालच्या भागावर हात ठेवला.

सारा म्हणाली – यापुढे असे होणार नाही

या प्रसंगाचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. लोक प्रशिक्षक आणि वडिलांवर जोरदार टीका करू लागले. त्यांचे वागणे कोणालाच आवडले नाही. यानंतर वाद वाढत असल्याचे पाहून टेनिसपटूने जे घडले ते व्हायला नको होते. यापुढे अशा पद्धतीने आनंद साजरा करणार नाही, असे सांगितले. सारा म्हणाली, ‘काही लोकांना हे अस्वस्थ वाटले असेल, पण ते झेक रिपब्लिकमध्ये असते तर असे झाले नसते. ही अमेरिका आहे. हे आमच्या बाबतीत सामान्य आहे. एक माझे वडील आहेत तर दुसरे माझे प्रशिक्षक, जे मला ८ वर्षांची असल्यापासून ओळखतात. आम्ही बोललो आहोत आणि आता पुन्हा कधीही असं होणार नाही.’

झेक रिपब्लिकच्या दूतावासाने बचाव केला

दुसरीकडे, झेक रिपब्लिकच्या दूतावासाने तीव्र प्रतिक्रिया आणि टीकेनंतर कोच आणि वडिलांचा बचाव केला. ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चाहत्यांनी त्याचे वर्णन भितीदायक, अत्यंत अशोभनीय आणि अस्वस्थ असे केले आहे. सारा बेझलेक चेक रिपब्लिकची एक आगामी स्टार आहे. अगदी लहान वयात, तिने फ्रेंच ओपन ज्युनियरच्या उपांत्य फेरीत पोहोचताना २०२२ मध्ये तीनआयटीएफ वर्ल्ड टेनिस टूरचे तीन खिताब जिंकले आहेत.