इंग्लंडचा धावांचा डोंगर; पहिल्या डावात ५७८ धावा
क्रीडा

इंग्लंडचा धावांचा डोंगर; पहिल्या डावात ५७८ धावा

चेन्नई : सलग दोन दिवस फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने तिसऱ्या दिवशी देखील फलंदाजीला सुरूवात केली. इंग्लंडने भारतासमोर मोठी धावसंख्या उभी केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न आहे. कर्णधार जो रूटने शानदार द्विशतक झळकावले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

८ बाद ५५५ पासून पुढे खेळताना इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्व बाद ५७८ धावा झाल्या आहेत, तिसऱ्या दिवशी भारताने पाहूण्या संघाचा ऑल आउट केला, बुमराह आणि अश्विनने तिसऱ्या दिवशी प्रत्येकी एक गडी बाद केल्याने त्यांच्या नावावर प्रत्येकी ३ बळींची नोंद झाली.

जसप्रीत बुमराहने डोमिनिक बेसची विकेट घेत इंग्लंडला नववा झटका दिला. तर, आर अश्विनने जेम्स एंडरसनला त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव संपण्यावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या पहिल्या डावाची सुरवात खराब झाली असून भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका बसला आहे. रोहित शर्मा ६ धावा करुन जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद १९ अशी झाली आहे.