आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर; ‘या’ संघाना झाला फायदा
क्रीडा

आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर; ‘या’ संघाना झाला फायदा

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय संघाला एक तर न्यूझीलंडला दोन गुणांचा फायदा झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसोटी क्रमवारीत भारतीय संघ १२१ तर न्यूझीलंड १२० गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या काळात भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर २-१ असे पराभूत केले. तर इंग्लंडविरुद्ध मायदेशात ३-१ ने मालिका जिंकली. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्या विरुद्धची मालिका २-०ने जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाने २०१७-१८ मध्ये इंग्लंडवर ४-० असा विजय मिळवला होता. हा विजय सध्याच्या क्रमवारीत विचारात घेतला नाही. याचा फायदा इंग्लंडला झाला. ते आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे १०९ तर ऑस्ट्रेलियाचे १०८ गुण आहेत. क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ सातव्या स्थानावर आहे. ही त्याची क्रमवारीतील सर्वात खराब कामगिरी आहे. श्रीलंका आठव्या, बांगलादेश नवव्या, झिम्बाब्वे १०व्या स्थानावर आहे.