अक्षर पटेल, वॉशिंग्टनची सुंदर खेळी, भारत दुसऱ्या डावात सर्वबाद ३६५
क्रीडा

अक्षर पटेल, वॉशिंग्टनची सुंदर खेळी, भारत दुसऱ्या डावात सर्वबाद ३६५

अहमदाबाद : इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ३६५ धावांवर ऑल आऊट झाला. ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताने १६० धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला, फक्त चार धावांसाठी त्याचं शतक हुकलं. अक्षर पटेल आऊट झाल्यानंतर इशांत शर्मा आणि सिराज यांनी एकामागोमाग एक विकेट गमावल्याने वॉशिंग्टन सुंदर शतक करु शकला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केली. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. भारताने एकूण १६० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला. पंतने शतकी खेळी करताना वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने ६ बाद १४६ अशा कठीण अवस्थेतीतील भारताला तारलं. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०१ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ गडी बाद झाल्यानंतर २९४ धावांसह भारताने सामन्यात आघाडी घेतली होती.