IPL Auction : दिल्लीला लॉटरी; केवळ एवढ्या रुपयांत स्टिव स्मिथची खरेदी
क्रीडा

IPL Auction : दिल्लीला लॉटरी; केवळ एवढ्या रुपयांत स्टिव स्मिथची खरेदी

चेन्नई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला दिल्लीच्या संघानं विकत घेतलं आहे. दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या स्मिथला २ कोटी २० लाख रुपयात दिल्ली संघानं विकत घेतल्याने दिल्लीला लॉटरी लागली असल्याची चर्चा आता होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएलच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान संघानं कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकलं. गेल्या हंगामातील त्याचा खराब फॉर्म ही त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरली होती. त्यामुळे राजस्थानने अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली होती. यंदा स्मिथला दिल्ली संघानं विकत घेतलं आहे.

लिलावात आरसीबीनं स्मिथवर मूळ किंमतीमध्ये बोली लावली होती मात्र, त्यानंतर दिल्लीनं दोन कोटी २० लाख रुपयांत स्मिथवर बोली लावली. अखेर दिल्लीनं स्मिथला आपल्या संघात घेतलं आहे. यंदाच्या हंगामात स्मिथ दिल्लीच्या संघाकडून खेळणार आहे. स्मिथला राजस्थान संघानं १२ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. पण यंदा स्मिथची किंमत खूपच घसरली आहे.