भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं
क्रीडा

भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं

दुबई : आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) ‘सुपर फोर’ मधील लढतीपूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली(Virat Kohli )ने ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ ( High Altitude Mask)लावून सराव केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याला ३५ धावा करता आल्या होत्या. त्यासाठी त्याने ३४ चेंडू घेतले होते. आता रविवारी पाकिस्तानविरुद्ध तो कशी कामगिरी करतो, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, भारताच्या इतर खेळाडूंनी कसून सराव केला.

काय आहे हाय एल्टीट्यूड मास्क, काय होतो फायदा

मास्क घालून मैदानावर धावतानाचा विराटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समुद्र सपाटीपासून अतिउंचावर (हाय अल्टिट्यूड) गेल्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. अशा वातावरणात केलेला सराव खेळाडूंना खूप उपयुक्त ठरतो. मात्र, अतिउंचावर न जाताही या वातावरणातील सराव खास मास्क घालून करता येतो. हा मास्क घातल्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण कमी करता येते. अशा परिस्थितीशी आपले शरीर जुळवून घेते आणि हृदय, फुफ्फुसाची क्षमता वाढवते. हा मास्क काढल्यानंतर शरीराला खूप उर्जा मिळते. स्टॅमिना वाढतो. याचा इतर खेळाडूंना मागे टाकण्यासाठी खूप फायदा होतो. अनेक व्यावसायिक खेळाडू अशा मास्कचा वापर करत असतात.

विराट परत येतोय….

गेल्या काही काळापासून धावा करण्यात अपयशी ठरलेल्या विराटने पुन्हा धावा करण्यास सुरूवात केली आहे. आशिया कपमध्ये ग्रुप फेरीत पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने ३५ धावा केल्या त्यानंतर हाँगकाँगविरुद्ध नाबाद ५९ धावा केल्या होत्या. भारताने ग्रुप फेरीत पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला होता. तर हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव करून सुपर -४ मध्ये प्रवेश केला होता.