शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर; करतोय पेट्रोप पंपावर काम
क्रीडा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर; करतोय पेट्रोप पंपावर काम

नागपूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सरकारला विसर पडला असून हा खेळाडू आता पेट्रोप पंपावर काम करत आहे. 16 वर्ष खेळाडू म्हणून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल ज्या प्रवीण वहालेला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. आज त्याच खेळाडूला पोट भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नोकरी करावी लागत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रवीण वहाले यांनी 1991 ते 2007 या काळात खो-खो आणि आट्यापाट्या या खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या काळात ज्युनिवर आणि सब ज्युनिअर स्पर्धेत 15वर मेडल त्यांनी मिळवली. त्यात जास्तीत जास्त गोल्ड मेडल आहेत. त्यांच्या या कार्याला बघून 2006 मध्ये तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला आहे.

मात्र शिवछत्रपती अवॉर्ड देऊन राज्य सरकारला प्रवीण वहाले या गुणवंत खेळाडूचा विसर पडला असून सरकारी नोकरीचे तर सोडा पण त्यांच्या गुणवत्तेचा वापर करून भविष्यातील खेळाडू तयार करून घेण्यासाठी प्रवीण वहाले यांची साधी आठवण राज्य सरकारला आली नाही. त्यामुळे 2006 नंतर त्यांनी पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कामासह कन्स्ट्रक्शन मजुरीचे काम सुरवात करायला केली. कोविड काळात तर प्रवीण वहालेंवर उपासमारीची वेळ आली होती.